पुणे : पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांचं जम्नस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. पुरंदर किल्ल्यावर आज संभाजी महाराजांचा पाळणा जोजवण्यात आला. त्याचबरोबर मोठ्या मिरवणुकांचंही आयोजन करण्यात आलंय. अनेक गावातील मंडळांनी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी पुरंदर किल्ल्य़ावर हजेरी लावली आहे. पारंपारिक वेशात अनेक मंडळी किल्ल्यावर दाखल झाली आहे.