पुरंदर, पुणे : प्रस्तावित विमानतळाविरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा
पुणे जिल्हातील पुरंदर तालुक्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी, एखतपूर, मुंजवाडी, कुंभारवळ, उदाचीवाडी ,वनपुरी या सात गावांतील शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी विमानतळाखाली जाणार असल्यानं त्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे.