मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेला हिरे व्यापारी नीरव मोदींचा गंडा?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2018 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर येत आहे. मुंबईतल्या ब्रिच कँडी परिसरातल्या शाखेत निरव मोदी या हिरे व्यापाऱ्याने आपल्या मित्रांच्या सहाय्याने बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे यासंदर्भात पंजाब नॅशनल बँकेनं मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या काही अकांऊटसद्वारे गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. काही खातेदारांच्या संगनमतानं हे व्यवहार झाल्याचं दिसतं आहे. इतर बॅंकांकडूनही या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये परदेशात पैसा पाठवला. बॅंकेनी हा प्रकार उघड होताच याची रितसर तक्रार कऱण्यात आल्याचीह बॅंकेनी माहिती दिली.