पुणे : कुख्यात गुंड सोन्या काळभोरवर येरवडा कारागृहात हल्ला
रावण सेना टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सोन्या काळभोरवर येरवडा कारागृहात आज हल्ला झाला. कारागृहात असणाऱ्या अनिकेतच्या चुलत भावानं हा हल्ला केला. सर्व कैद्यांना कारागृहातील आवारात सोडण्यात आलं होतं. यावेळी अनिकेतच्या भावानं हातातील पाण्याची ब़ॉटल सोन्या काळभोरच्या दिशेने फेकली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. याप्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी रावण सेना टोळीचा प्रमुख गुंड अनिकेत जाधवची हत्या झाली . त्याप्रकरणी सोन्या काळभोर अटकेत आहे.