पुणे : येरवडा कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यावर गोळीबार, हल्लेखोराचा नेम चुकला

Continues below advertisement
येरवडा कारागृहाबाहेर तुरुंग अधिकारी मोहन पाटील यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून पाटील बचावले आहेत.
सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी मोहन पाटील यांच्यावर गावठी कट्यातून गोळी झाडली. त्यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी तेथून पसार झाले. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या गोळीबारामागे कैद्यांचा काही संबंध आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करतायेत. दरम्यान, येरवडा कारागृहाबाहेर तुरुंगाधिकाऱ्यांवर गोळीबार करण्याच्या या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram