पुणे | लेखिका कविता महाजन यांचं निधन, मान्यवरांच्या भावना
ब्र, भिन्न सारख्या वेगळ्या विषयांवरील लेखनामुळे नावारुपास आलेल्या प्रख्यात लेखिका कविता महाजन यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात न्यूमोनियामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कविता महाजन 51 वर्षांच्या होत्या.