पुणे : चपाती 20 सेमीचीच हवी, अडेलतट्टू पतीविरोधात पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज
Continues below advertisement
सध्या कौटुंबिक हिंसाचार आणि त्यामुळे होणारे घटस्फोट यांचं प्रमाण खूपच वाढलं आहे. त्यामगची कारणंही वेगवेगळी आहेत. पुण्यात घटस्फोटासाठी चपातीचा आकार हे एक प्रमुख कारणांपैकी एक कारण ठरलं आहे.
एका आयटी इंजिनिअरने चपातीच्या आकारावरुन कौटुंबिक हिंसाचार केल्याचा दावा, पत्नीने केला आहे. त्यामुळे पतीची मारहाण, क्रूरता याला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
तसंच पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दावाही दाखल केला आहे.
दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये दोघांचं लग्न झालं. मात्र आयटी क्षेत्रात असलेला पती अती काटेकोर असल्याचं पत्नीचं म्हणणं आहे.
दिवसभरात काय काय केलं, ते एक्सेल शीटमध्ये वेगवेगळ्या रंगात करण्यास सांगत असे. जर ते केलं नसेल, तर त्याचं कारण लिहिण्यासाठी एक कॉलम असे. तो ही भरला नाही तर शिवीगाळ, घालून पाडून बोलणं आणि मारहाण होत असे, असं पत्नीचं म्हणणं आहे.