पुणे : दुधीचा रस प्यायल्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेचा मृत्यू

Continues below advertisement
दुधीचा रस प्यायल्यानंतर पुण्यात 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोणत्याही आजाराची पार्श्वभूमी नसताना झालेल्या अपमृत्यूमुळे काळजी व्यक्त केली जात आहे.

दुधीचा रस पिण्यापूर्वी सावधानता बाळगण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

संबंधित महिलेने 12 जून रोजी ग्लासभर दुधीचा रस प्यायला. अर्ध्या तासातच तिला उलट्या आणि जुलाब यांचा त्रास सुरु झाला. तीन दिवसात तिची प्रकृती आणखी खालावत गेली. 16 जूनच्या मध्यरात्री शरीरांतर्गत गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram