पुणे | चंद्रकांत पाटलांकडून राम कदमांची पाठराखण, विश्वजीत कदम यांची प्रतिक्रिया
बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप आमदार राम कदम यांची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे. "राम कदमांनी माफी मागितली आहे, त्यामुळे हा विषय आता संपायला हवा", असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.
"राम कदम यांची पार्श्वभूमी पहिली तर महिलांना मदत करणारी आहे. हजारो महिला त्यांना राखी बांधतात. एखादं वाक्य चुकून गेलं तर त्याचा अर्थ काय होता? आणि जरी चुकीचा अर्थ निघत असेल, तरी त्यांनी आता जाहीर माफी मागितल्यावर विषय संपवायला हवा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी कदमांची केलेली पाठराखण हे भाजपची संस्कृती दाखवतात.. शिवाय राम कदम यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलणं कितपत योग्य, असा सवालही काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी उपस्थित केलाय