पुणे : विश्रामबाग वाड्यातील जुनी धातूची तोफ विनापरवानगी हलवण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या विश्रामबाग वाड्यातील जुनी धातूची तोफ विनापरवानगी हलवण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय... शनिवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान विश्रामवाड्यातील तोफ बाहेर आणून वाहनामध्ये ठेवताना काही तरूणांनी पाहिलंय... तरूणांनी अधिक चौकशी केल्यानंतर तोफ महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठानकडून हलवली जात असून कोथरूड शिवसृष्टीत ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं...मात्र तोफ नेणाऱ्यांकडे परवानगीचे कठुलेही कागदपत्र उपलब्ध नव्हते... दरम्यान पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तोफ परत विश्रामवागवाड्यात ठेवण्यात आली...पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या विश्रामबाग वाड्यातूनच अशाप्रकारे संशयास्पदरित्या ऐतिहासिक वस्तू हलवण्याचा प्रकार समोर आल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होताहेत.