पुणे: प्राच्यविद्या संशोधक मधुकर ढवळीकर यांचा परिचय
Continues below advertisement
भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ पुरातत्व तज्ज्ञ, प्राच्यविद्या संशोधक प्राध्यापक डॉक्टर मधुकर केशव ढवळीकर यांचं काल रात्री उशीरा पुण्यात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, पटकथा लेखक असलेले त्यांचे सुपुत्र शेखर ढवळीकर व नातवंडे असा परिवार आहे. पुरातत्व क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानामुळे त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं.
Continues below advertisement