ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन | पुणे | एबीपी माझा
ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं आहे. पुण्यात वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लालन सारंग यांच्या जाण्यानं सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. लालन सारंग या 1968 पासून नाट्यक्षेत्रात काम करत होत्या.