पुणे: यापुढे वंचित बहुजन आघाडी बॅनरखाली निवडणुका लढणार: प्रकाश आंबेडकर
येणाऱ्या निवडणुका पुरोगामी पक्षांना एकत्र घेऊन वंचित बहुजन आघाडी बॅनरखाली लढणार आहोत. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी होऊ शकतात. अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
जो पक्ष भटक्या विमुक्त, माळी, आलुतेदार आणि मुस्लिमांना प्रत्येकी दोन उमेदवार देईल. त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का हा प्रश्न आहे. यापूर्वीही 2009 च्या निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर यांनी रिडालोस अर्थात रिपब्लिकन डावी लोकशाही समितीचा प्रयोग केला पण त्याला फारसं यश मिळालं नव्हतं