पुणे : विद्यार्थ्यांच्या उपोषणानंतर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागप्रमुख पदमुक्त

Continues below advertisement
पुणे विद्यापीठातल्या इंग्रजी विभागप्रमुखांना विद्यार्थ्यांच्या उपोषणानंतर पदमुक्त करण्यात आलं आहे. विभागप्रमुखांबाबत याआधी अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. विभागप्रमुख चंद्राणी चॅटर्जी यांना पदावरुन हटवण्यासाठी एमएच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी 4 दिवसांपासून उपोषण केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीवरुन चंद्राणी चॅटर्जी यांना पदमुक्त करण्यात आलं आहे आणि सध्या इंग्रजी विभागाचा अतिरिक्त कार्यभार संजय सोनावणे सांभाळणार आहेत. दरम्यान, चंद्राणी चॅटर्जी यांनी स्वत: पत्र लिहून आपल्याला विभागप्रमुख पदावरुन कार्यमुक्त करण्याची विनंती विद्यापीठाकडे केली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram