पुणे : मनपाच्या नव्या इमारतीत गळती, विरोधकांचं छत्री आंदोलन
Continues below advertisement
पुणे महापालिकेच्या नव्या इमारत उद्घाटनादिवशीच झालेल्या गळतीविरोधात विरोधकांनी पालिकेच्या सभागृहातच छत्र्या घेऊन आंदोलन केलं. पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनावेळी झालेल्या गळतीचा विरोधकांनी निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं इमारत गळतीविरोधात चर्चा झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली. तर या निकृष्ट कामाला जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी सर्व विरोधकांनी केले.
Continues below advertisement