पुणे : पोलीस आता शहरात सायकलवर पेट्रोलिंग करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Feb 2018 11:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सायकलिंचं शहर अशी पुण्याची जुनी ओळख परत आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतलाय. वाहतूक पोलिसांनी सायकलच्या आधारे पेट्रोलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ट्रॅफिकमधून सायकल झटपट मार्ग काढू शकते, सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. हे फायदे लक्षात घेता आणि प्रदुषण टाळण्याकरता वाहतुक पोलिसांनी पुढाकार घेतलाय. पुणे खडकी वाहतूक विभागाकडून या उपक्रमाची सुरूवात झालीये. सध्या त्यांच्याकडे दहा सायकली आहे. अधिकाधिक लोकांनी सायकलचा वापर करावा असं आवाहन सध्या वाहतूक पोलिसांकडून केलं जातंय.