पुणे : न्यायाधीशाच्या पतीची डेक्कनमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण

Continues below advertisement
तब्बल 10 तासानंतरही वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या श्याम भदाणेवर गुन्हा दाखल झालेला नाही.  आज दुपारी 12 ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास डेक्कन परिसरात श्याम भदाणे नो एन्ट्रीतून दुचाकी घेऊन आले.  यावेळी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र इंगळेंनी त्यांना अडवलं. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, आणि श्याम भदाणेनं रवींद्र इंगळेंना मारहाण केली. एवढं सगळं होऊनंही केवळ श्याम भदाणेची पत्नी न्यायाधीश असल्यानं अद्यापही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे आपल्या देशात कायदा सर्वांना समान आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram