पुणे : भोरजवळील डिवळे गावातील शिवारात 3 बिबटे मृतावस्थेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2018 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात एका शिवारात 3 बिबटे मृतावस्थेत आढळलेत... काल दुपारी डिवळे गावात हे 3 बिबटे मृतावस्थेत सापडले... यामध्ये 2 नर आणि एका मादी बिबट्याचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले... याच गावात रविवारी 10 ते 15 कावळे मृतावस्थेत सापडले होते... त्या कावळ्यांना विषबाधा झाल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला होता... त्यामुळे बिबट्यांवरही विषप्रयोग करण्यात आला होता का? याचा तपास वन अधिकारी करत आहेत...