पुणे : महिला रुग्णाच्या उपचारासाठी मांत्रिकाचा वापर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकार
Continues below advertisement
महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क डॉक्टरकडूनच मंत्रतंत्राचा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्दैवाने या घटनेत विवाहितेला प्राण गमवावे लागले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.
पुण्यातील स्वारगेट परिसरातील डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे संध्या सोनवणे ही 24 वर्षीय महिला उपचारासाठी आली होती. तिच्या छातीत दुधाची गाठ झाल्याचा अहवाल आला. मात्र ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती खालावली.
संध्याला तिला तातडीने पुण्यातील डॉ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे डॉ. सतीश चव्हाण यांनी एका मांत्रिकाला बोलावून मंत्रतंत्राचा वापर केला. याबाबत जाब विचारला असता, देव आणि मांत्रिकावर आपली श्रद्धा असल्यामुळे हे मंत्रोपचार करत असल्याचं डॉ. चव्हाण म्हणाले.