पुणे : मुजुमदार वाड्याची दूरवस्था, सुधीर गाडगीळ यांची प्रतिक्रिया
पुण्यातील मुजुमदार वाड्याच्या दूरवस्था एबीपी माझाने समोर आणल्यानंतर महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासक, संवेदनशील व्यक्ती आणि सामान्य पुणेकरांनी वाडा वाचवण्यासाठी हाक दिली आहे.
1770 साली शनिवारवाड्याजवळ या वाड्याची उभारणी केली होती. 100 खोल्यांचा हा वाडा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
शिवाय या वाड्यात अनेक पेशवेकालीन वस्तू आहेत. त्यात 17 व्या शतकातील भांडी, कागदपत्रं, वाद्यांचा समावेश आहे. मात्र महापालिकेने अतिक्रमण हटवताना या वाड्याच्या भिंतीला धक्का लावला. पुणे पालिकेने या वास्तूला स्थानिक ऐतिहासिक वारसा म्हणून हा वाडा घोषित केलाय. मात्र त्याच्या डागडुजीकडे अजिबात लक्ष न दिल्याने पुणेकर, इतिहास अभ्यासक नाराज आहेत.