पुणे : तेराशे शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात छात्रभारतीचं आंदोलन
Continues below advertisement
राज्य सरकारनं तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं सर्वत्र संतापाचा वातावरण आहे. या निर्णयाविरोधात पुण्यात छात्रभारतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. या शाळा बंद झाल्यानंतर दुर्गम भागातील मुलांचं मोठं नुकसान होणार आहे. तसेच कोकणातील मुलांना तर थेट तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणार आहे. त्यामुळं हा निर्णय सरकारनं मागं घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
Continues below advertisement