Pune Metro | पुणे मेट्रोची लवकरच ट्रायल रन! | पुणे | ABP Majha
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी....विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत... आणि त्यासाठीच नागपूर मेट्रोचे रुळ पुण्यात आणले गेले. पिंपरीतील मेट्रोचं 6 किलोमीटचं बांधकाम आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे.यावर बसवले जाणारे रूळ हे नव्याने विक्री करण्याऐवजी थेट नागपूरहुन मागवण्यात आलेत. आता हेच रूळ पुणे मेट्रो मार्गासाठी वापरून विधानसभा निवडणुकापूर्वी ट्रायल रन घेण्याचा विचार आहे..