पुणे: मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनीक बेमुदत संपावर
राज्यातील मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनीक बेमुदत संपावर गेले आहेत. त्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. यासाठी वेळोवेळी निवेदने दिली, निदर्शने केली मात्र शासनाकडून त्याची दखल घेतली गेली नाही. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारनं ई-चलन तसेच ई-एसबीटीआर ही प्रणाली सुरु केली आहे. सध्या ही पद्धत बँकांमार्फत राबवली जात आहे. मात्र ही प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनीक यांच्याकडून राबविण्यात यावी अशी मागणी आंदोलकांची आहे.