एसटी संप पुणे : खाजगी वाहनांचे दर दामदुप्पट, प्रवाशांचा खोळंबा
Continues below advertisement
सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. हा संप मोडित काढण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. कर्मचाऱ्यांनी संप थांबवला नाही, तर पगारवाढ रद्द करु अशी धमकी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिली आहे. पगारवाढ करुनही संप सुरु असल्याचा दावा सरकार करत आहे. दुसरीकडे खाजगी वाहनांचे दर दामदुप्पट झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे. एसटीच्या संपामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.
Continues below advertisement