पुणे : कशी आहेत दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं?
Continues below advertisement
येत्या वर्षात जी मुलं दहावीला जाणार आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी..य़ापुढं इयत्ता दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नवीन पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसंच काही विद्यार्थ्यांना या पुस्तकांचं वाटपही केलं. यापुढं दहावीच्या पुस्तकातला कोणताही धडा ऑप्शनला टाकता येणार नाही. सर्व धडे शिक्षकांना शिकवावे लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीवर आधारीत दहावीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचं यावेळी तावडेंनी सांगितलं. मात्र यंदा नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या किंमतीत १० रुपयांनी वाढ केली गेलीय, त्यामुळं पालकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
Continues below advertisement