पुणे : दौंडमध्ये एसआरपीएफच्या जवानाकडून अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू

Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एका माथेफिरुने केलेल्या गोळीबारात तीघांचा बळी गेला. दौंडमधील नगर मोरी आणि बोरावके नगर इथं हा थरारक प्रकार घडला आहे. महत्वाची बाब म्हणजे गोळीबार करणारा संजय शिंदे नावाचा राज्य राखीव पोलीस दलाचा कर्मचारी आहे. या माथेफिरुने केलेल्या गोळीबारात अमोल जाधव, गोपाळ शिंदे आणि प्रशांत पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा माथेफिरु त्याच्या घरी जाऊन बसला असून, पोलिसांनी माग काढत त्याच्या घराला वेढा दिला आहे. शिंदे यांनं गोळीबार का केला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram