पुणे : भूगावमध्ये 'महाराष्ट्र केसरी'चं आयोजन, भूगावकरांशी खास बातचित
Continues below advertisement
महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला देण्यात येणाऱ्या मानाच्या चांदीच्या गदेचे आज सकाळी पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कुस्ती पंच चंद्रकांत मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांनी केले होते. महाराष्ट्र केसरी कुस्तीला उद्यापासून पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावमध्ये सुरुवात होत आहे.
महाराष्ट्र केसरी पैलवानासाठीच्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र केसरीला 1961 साली सुरुवात झाली. तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. 1982 सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं देण्यात येत होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा होताच, अशोक मोहोळ व चंद्रकांत मोहोळ गदा निर्मितीच्या कार्याला सुरुवात करतात. स्पर्धेच्या ठिकाणी ते स्वत: गदा घेऊन जातात.