पुणे : पुण्यात आर. आर. पाटलांची मुलगी स्मिताचा विवाह सोहळा
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील हिचा आज विवाह सोहळा पुण्यात पार पडला. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद याच्यासोबत स्मिताचा विवाह झाला. या विवाहात पाहुण्यांच्या स्वागताला खुद्द राष्ट्रवादी नेते अजित पवार उभे होते...तर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना आपल्या हाताने अक्षताचं वाटप केलं.
लेकीच्या लग्नात आबांची उणीव भासत असल्यानं राष्ट्रवादी खासदार सुप्रीया सुळेंनी आबांच्या पत्नीचं सांत्वनही केलंय....दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारा यांच्या पुढाकाराने हे लग्न जळून आलंय. मात्र तब्येतीच्या कारणस्तव शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.