पुणे : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 150 ठिकाणी मोफत इंटरनेट
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुणेकरांना शहरात सुमारे 150 ठिकाणी मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. प्रामुख्याने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ही सुविधा देण्यात येते. त्यात महाविद्यालये, प्रमुख रस्ते, पोलीस ठाणे, उद्याने महापालिकेच्या इमारती यांचा समावेश असणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीस सुमारे 50 एमबी इंटरनेट मोफत वापरता येणार आहे. रेलटेल, एल अँड टी आणि गुगल यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.