पुणे : परशुराम वाघमारेच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एसआयटी प्रयत्नशील

Continues below advertisement
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम वाघमारेची चौकशी होणार. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या परशुराम वाघमारेचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी बंगळुरुला जाऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

एसआयटीचे अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहेत. गौर लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आधी मे महिन्यात तिघांना अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरुला जाऊन त्यांची चौकशी केली होती. आता परशुराम वाघमारेचीही चौकशी करण्यासाठी एसआयटीची टीम जाणार आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली बंदूकच एमएम कलबुर्गी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरल्याचं कर्नाटक पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर सांगितलं.

पानसरे यांच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. त्यातील एक पिस्तुल गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली, तर दुसरी पिस्तुल डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचं कर्नाटक पोलिसांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर पोलीस आणि महाराष्ट्र एसआयटी कर्नाटक एसआयटीच्या संपर्कात असून, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संशयित वाघमारे याचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram