पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळ शिवशाही बसचा अपघात
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नव्याने दाखल झालेल्या शिवशाही बसचा पुणे नाशिक मार्गावर अपघात झाला. मध्यरात्री तीनच्या सुमारास मंचरजवळ ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंचरजवळच्या वळणावर बसचालकाचा ताबा सुटल्याने बस रस्ता सोडून थेट शेतात गेली. यावेळी बसची जवळच असलेल्या ढाब्याला धडक बसली. यात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.