पुणे : कोर्टाने जामीन अर्ज फेटाळूनही मिलिंद एकबोटेंना अटक नाही, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मुंबई हायकोर्टानं मिलिंद एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळला तरीही पोलिसांना एकबोटे सापडत नाहीत का असा प्रश्न पडलाय.
खऱं तर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक आहेत. त्यांनी अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली. पण मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात त्यांना काय अडचण आहे. हक यांना एकबोटे सापडत नाहीत का असाही सवाल विचारला जातोय. नाही म्हणायला कालपासून पोलिसांनी मिलिंद एकबोटेंच्या शिवाजीनगरमधील घराबाहेर चोवीस तास पाळत ठेवलीय. मात्र त्यातही ड्युटीवरील पोलीस दयानंद निम्हण काही काळ गायब झाल्यानं त्याला पोलीस निरीक्षक गावडेंनी झापलं. त्यानंतर दयानंद निम्हण फोन स्वीच ऑफ करुन निघून गेले. तसंच माझं काही बरंवाईट झालं तर त्याची जबाबदारी गावडेंची असेल अशी चिठ्ठीही लिहून ठेवली. मात्र पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटलांच्या मध्यस्थीनंतर निम्हण परत आले.