पुणे: मराठा आंदोलन: नाशिकहून पुण्याला जाणारी ST वाहतूक बंद
चाकण मधल्या हिंसाचारांनातर नाशिकहून पुण्याला जाणारी ST वाहतूक बंद आहे. परिस्थिती नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे. मंचर, नारायणगाव, आळेफाटा इथे जाणाऱ्या गाड्याही बंद आहेत. यामुळे प्रवाश्यांची गैरसोय झाली आहे. काही प्रवासी कालही बस स्थानकावर आले होते. पण काल बसेस गेल्या नाहीत. आजही या रस्त्यावर बस बंद असल्याने प्रवाश्यांचा खोळंबा झाला आहे. आंदोलकांनी बसचं नुकसान न करता असा खोळंबा होऊ देऊ नये, असं आवाहन प्रवाशांनी केलं आहे.