School Start | उन्हाळी सुट्टीनंतर राज्यभरात शाळांना सुरुवात, चिमुकल्यांचं उत्साहात स्वागत | ABP Majha

Continues below advertisement
उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्यानंतर राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. नवीन इयत्ता, नवे शिक्षक आणि पालकांना सोडून पुन्हा शाळेत जाताना चिमुरडे हमसून हमसून रडत आहेत. तर माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या भीतीने गोळा आला आहे. त्याच वेळी दीर्घ सुट्टीनंतर जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. मिकी-डोनाल्डसारख्या कार्टून्सच्या उपस्थितीत शाळा प्रशासनाकडून गुलाब पुष्प देऊन आणि ढोलताशे वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram