पुण्यातील 'नुमवि'मधल्या चिमुकल्यांचं दिवाळीचं प्लॅनिंग काय? | पुणे | एबीपी माझा
दिवाळीनिमित्त उद्यापासून शाळांना सुट्टी असल्यानं आज पुण्यातील नूमवी शाळेच्या शिशुगृहात खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुट्टी मिळणार म्हणून बच्चेकंपनीमध्ये चांगलाच उत्साह आहे. दिवाळी कशी साजरी करायची... कोणते नवीन कपडे घ्यायचे, मामाच्या गावाला जायचंय का... दिवाळीत काय काय खायचं... या सगळ्याचं प्लॅनिंग बच्चेकंपनीनं तयार केलंय. कसं आहे हे प्लॅनिंग, जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी मानसी देशपांडे हिने...