ABP News

पुणे : सुप्रीम कोर्टाचा महामेट्रोला दणका, पुणे मेट्रो खटला चालवण्याचा हरित लवादाला अधिकार

Continues below advertisement

पुणे मेट्रोचा पर्यावरणाशी संबंधित खटला चालवण्याचा अधिकार राष्ट्रीय हरीत लवादाला आहे, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला निकाल मेट्रोची निर्मिती करणाऱ्या महामेट्रो कंपनीसाठी बंधनकारक असणार आहे . पुण्यातील कोथरूड ते शिवाजीनगर या भागांना मेट्रोनं जोडण्यासाठी मुठा नदीच्या पात्रातून मेट्रोचा मार्ग आखण्यात आला आहे. पुण्यातील पर्यावरण प्रेमी संघटनांनी या मार्गाला आक्षेप घेत राष्ट्रीय हरीत लवादात याचिका दाखल केली . मात्र राष्ट्रीय हरित लवादाला मेट्रोशी संबंधित खटले चालवण्याचा अधिकारच नाही अशी भूमिका घेत महामेट्रो आणि पुणे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत हरीत लवादाला खटला चालवण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram