पुणे : गिरीश बापटांवर कारवाईचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा : संजय काकडे
गिरीष बापट यांच्या सरकार बदलेल वक्तव्यावरून पुण्यात बापट विरूद्ध काकडे वाद पुन्हा समोर आला आहे. पुढच्या वर्षी सरकार बदलेल, असं वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केलं होतं. त्यासाठी त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी भाजप खासदार संजय काकडे यांनी केली आहे. गुजरात निवडणुकीवेळी भाजपची हार होईल, असं भाकित संजय काकडेंनी केलं होतं. त्यावर गिरीष बापट यांच्या समर्थकांनी काकडेंवर कारवाईची मागणी केली होती.