पुणे : पुण्याची लोकसभा निवडणूक मीच लढवणार, संजय काकडेंची स्वत:लाच उमेदवारी जाहीर
Continues below advertisement
पुण्याची लोकसभा निवडणूक मीच लढवणार, अशी घोषणा भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी स्वतःच केली आहे. पुण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःलाच आगामी लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर केलं.
संजय काकडे यांनी केलेल्या सर्वेक्षण केला. "पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यापेक्षा आपण उजवे आहोत. तसंच पुण्यातील भाजपच्या आठ आमदारांपैकी चार आमदार डेंजर झोनमध्ये असून त्यांचा पराभव होऊ शकतो," असा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपणच योग्य असल्याचं सांगत त्यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता भाजप कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.