पुणे : सदाभाऊ खोत यांचे अधिकाऱ्यांना 'सेल्फी विथ फार्मर'चे आदेश
Continues below advertisement
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना ‘सेल्फी विथ फार्मर’चे आदेश दिले आहेत. खरीपाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन सेल्फी घ्यावी, असा आदेश सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
अधिकारी शेतात बांधावर गेलेत याचा पुरावा म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढून पाठवावा, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. अगदी कृषी विभागातील आयुक्तांपासून ते गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांपर्यंत सगळ्यांनी सेल्फी काढून पाठवायचा आहे.
पुण्यात सदाभाऊ खोत यांनी खरीप हंगामाचीही माहिती दिली. यावर्षी कापसाचं लागवड क्षेत्र घटल्याचं त्यांनी सांगितलं.