पुणे : संगम पुलाजवळच्या आरटीओ कार्यालयात पुन्हा आग

Continues below advertisement
आरटीओ कार्यालयात आग लागून महत्त्वाची कागदपत्रे भस्मसात झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास संगम पुलाजवळच्या आरटीओ कार्यालयात आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली... या माहितीच्या आधारे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या... आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटात आगीवर निय़ंत्रण मिळवलं... पण तोपर्यंत पहिल्या मजल्यावरच्या खोलीत लागलेल्या आगीमध्ये कागदपत्रे भस्मसात झाली आहेत.
याच कार्यालयात 13 जून रोजीही आग लागली होती... त्यावेळीही अनेक कागदपत्रांची राखरांगोळी झाली होती... त्यामुळे या अग्नीसत्राचं कारण काय? याचं गूढ निर्माण झालं आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram