पुणे : दौंडमध्ये त्रासाला कंटाळून आरटीआय कार्यकर्त्याची आत्महत्या

मदरशाशी संबंधित लोकांच्या त्रासाला कंटाळून दौंडमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याने आत्महत्या केलीय....निसार शेख असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे...पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात एकाच नावाचे दोन मदरसे चालु आहेत...  माहिती अधिकारात त्याची माहिती शेख यांनी मागितली होती...याचा पाठपुरावा धर्मदाय आयुक्तांकडे ते सातत्याने करत होते. यामुळे  मदरश्याशी संबंधित अकरा जण त्यांना त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी मृत्यूपुर्वी तयार केलेल्या व्हिडीओत केलाय.... आत्महत्येपूर्वी त्यांनी  चिट्टीही लिहून ठेवलीय...दरम्यान निसार यांच्या कुटूंबियांनी मात्र जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घण्याचा निर्णय घेतलाय....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola