पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजाच्या मारेकऱ्यांना अटक करा : रिपाइं
पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दंगलीतील साक्षीदार पूजा सकट हिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली. यावरुन सध्या राजकारण तापलंय. पूजाच्या मारेकऱ्यांना लवकर अटक करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये पूजाचं घर जाळण्यात आलं होतं, त्यानंतर तिचं कुटुंब ज्या घरात राहत होतं ते घर लवकर रिकामं करण्याचा तगादा लावला जात होता. त्या मानसिक अवस्थेत तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं.