पुणे : हायकोर्टाच्या दणक्यानंतर डीएस कुलकर्णी 50 कोटी कसे जमा करणार?
डीएसकेंनी तात्काळ 50 कोटी जमा न केल्यास त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 50 कोटी नेमकी कधी भरणार याविषयी हायकोर्टात सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करणं डीएसकेंना अनिवार्य आहे. गुंतवणूकदारांची थकितबाकी या पैशांमधून दिली चुकती केली जाणार आहे. नफ्यातील 25 टक्के रक्कम तात्काळ जमा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. तसंच विकताय येणाऱ्या संपत्तींची यादीही हायकोर्टानं डीएसकेंना सादर करण्याचे आदेश दिले होते.