डीएसके प्रकरण : बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक रवींद्र मराठे यांना पदावरुन हटवलं

Continues below advertisement

डीएसकेंना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे संचालक रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर के गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. रवींद्र मराठे आणि आर के गुप्ता यांना पदावरून हटवण्यात आलं आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रचे सध्याचे कार्यकारी संचालक ए सी रावत यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला ही माहिती कळवली आहे.

डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी रवींद्र मराठेंसह काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मराठे यांना दोन दिवसांपूर्वी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता. मराठे यांची चौकशी पूर्ण झाली असून आवश्यक ती कागदपत्र ताब्यात घेण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर केला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram