पुणे : रांका ज्वेलर्सचे दीड कोटींचे हिरे लुटले

Continues below advertisement
पुण्यात रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करुन दीड कोटींचे हिरे लुटल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री पुणे स्टेशनजवळ घडलेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडालीय. रांका ज्वेलर्सचा कर्मचारी अजय होगाडे हे मुंबई येथून 1 कोटी 48 लाख किमतीचे हिरे घेऊन पुण्याकडे येत होते. पुणे स्टेशनच्या बाहेर आल्यावर 2 ते 3 अनोळखी इसमांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. आणि त्यांच्याजवळील  सॅकमधील हिरे लुटून नेले आहेत. प्लॅटफॉर्म नंबर सहाच्या पलीकडे असलेल्या रिक्षास्टँडजवळ ही घटना घडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram