पुणे : रांका ज्वेलर्स चोरी प्रकरण, फिर्यादीच निघाला चोर

पुण्यातील रांका ज्वेलर्सचे चोरी झालेले दागिने अखेर पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दागिन्यांची चोरी झाल्याचा दावा करणारा कर्मचारीच या घटनेत चोर निघाला आहे. अजय होगाडे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कर्जबाजारी झाल्यानं ही चोरी केल्याची कबुली त्यानं दिली आहे. सुमारे दीड कोटी रुपये एवढी या दागिन्यांची किंमत होती. आरोपीनं आपले वडील आणि भावाच्या मदतीनं हे कृत्य केल्याचं पोलिस तपासात  समोर आलं आहे. आरोपींनी हा मुद्देमाल एका डब्यात ठेवून तो डबा जमिनीत पुरला होता. पोलिसांनी हे सर्व दागिने हस्तगत केले आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola