UNCUT : पुणे : महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि रामदास फुटाणे यांच्या कविता
Continues below advertisement
भारत कधी-कधी माझा देश आहे, असं म्हणत ज्यांनी महाराष्ट्रातल्या सामाजिक, राजकीय त्रुटींवर उपरोधिकपणे बोट ठेवलं, त्या रामदास फुटाणेंची एक कविता सध्या सोशल मीडियात व्हायरल होतेय. संभाजी भिडे यांनी मनूबद्दल केलेल्या विधानावर रामदास फुटाणेंनी ही कविता लिहीली आहे. मात्र ही एकच नव्हे तर याआधीही फुटाणेंच्या अनेक कविता गाजल्या, लोकांना त्यांच्या कवितांनी अंतर्मूख केलं. मात्र काही दशकांपूर्वी लिहिलेल्या कवितांचे संदर्भ आजही तसेच आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एबीपी माझानं रामदास फुटाणेंशी संवाद साधला.
Continues below advertisement