पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्यापासून शहरांचा दुधपुरवठा रोखणार
स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्यापासून शहरांचा दुधपुरवठा तोडणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा दिल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. आज रात्री पंढरपूरमध्ये विठ्ठलाला दूधाचा अभिषेक करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. यात प्रामुख्यानं मुंबई शहराचा दूधपुरवठा बंद करण्यात येणार आहे.