पुणे : मेडिकलच्या प्रवेशात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या, राज ठाकरेंचा सरकारला इशारा
‘नीट’ परीक्षेसाठी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळावं. इतर राज्यांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं, मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नीट परीक्षेवरुन सरकार गोंधळ निर्माण करतंय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.