पुणे : राष्ट्रकुल जिंकलं, आता राहुल आवारेने ऑलिंपिकमध्येही सुवर्णपदक मिळवावं : काका पवार

महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने राष्ट्रकुलचं मैदान गाजवलं. बीडचा पैलवान आणि वस्ताद काका पवार यांचा पठ्ठ्या राहुल आवारेने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली. राहुलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं.

राहुलने सव्वा तासात तीन कुस्त्या एकहाती जिंकून ढाण्यावाघासारखी फायनलमध्ये धडक मारली. फायनलध्ये त्याचा मुकाबला कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशी विरोधात होता.

राहुलची शरिरयष्टी स्टीव्हन ताकाहाशीच्या तुलनेत किरकोळ होती. राहुल ही कुस्ती मारणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र राहुलने पहिल्यापासूनच चित्त्यासारखी चपळाई दाखवली. राहुलने सुरुवातीलाच 2 मेडल मिळवत आघाडी मिळवली.

 त्यानंतर राहुल वाघासारखा झुंजला. त्याने स्टीव्हनला अक्षरश: मानही वर काढू दिली नाही. त्याचाच परिणाम म्हणजे तब्बल 15-7 अशा मोठ्या फरकाने राहुल जिंकला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola